मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

0
44

जळगाव ः प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी ३१ डिसेंबर रोजी पाच कर्मचारी निवृत्त होत असताना त्यापैकी एक कर्मचारी हा हवलदार म्हणूनच निवृत्त का होत आहे याबाबत चौकशी केली असता कार्यालयीन दिरंगाईमुळे त्याला पदोन्नती नाही म्हणून डॉक्टर मुंडे यांनी त्वरित प्रशासकीय सूत्रे हलवून निवृत्त होणार्‍या हवालदारास त्याच दिवशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थातच जमादार पदाची पदोन्नती दिली व संध्याकाळी त्याला निवृत्ती देऊन निरोप देण्यात आला.
ज्या हवालदाराला पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले होते ते हवलदार अब्दुल हकीम वाहिद शेख हे मनियार बिरादरी शी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांचा जो सन्मान केला होता तो जरी कर्तव्याचा भाग असला तरी एका पोलीस अधिकार्‍याने आपल्या लहान सहकार्‍याकडे बघून आपला डॉक्टरी पेशा आत्मसात करून लागलीच त्या हवालदारास व कार्यालयाच्या कर्मचार्‍यांवर योग्य वेळी औषधोपचार केल्याने त्या हवालदाराला जमादार म्हणून सेवानिवृत्ती मिळाली व त्याला समाजात प्रतिष्ठा व पेन्शनमध्ये आर्थिक फायदा सुद्धा झाल्याने मानियार बिरादरीने जळगाव पोलीस बॉईज संघटना व सेवा निवृत्ती पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ मुंडे यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन गौरव केला .
यांच्या हस्ते झाला गौरव
सर्वप्रथम पोलीस बॉईज संघटनेचे कुणाल मोरे ,निवेदिता ताठे, किरण राजपूत व राहुल टोके यांनी श्रीफळ वाढविले तर निवृत्त जमादार अकबर शेख, हैदर शेख व हकीम शेख यांनी शाल अर्पण केली. मानियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चॉंद व उपाध्यक्ष सलीम मोहम्मद व ऍड.आमीर शेख यांनी पुष्पगुच्छ अर्पित केले तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी मानपत्र सादर केले.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी गौरव करणार्‍या या तिघी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना उद्देशून संवाद साधला व यात कोणतेही नवीन कार्य नसून तो माझ्या नियोजित कार्यालयीन कामाचा एक भाग होता ते माझे कर्तव्य होते परंतु आपण तीन संघटना एकत्रित येऊन जो माझा गौरव केलेला आहे तो माझा गौरव व्यक्तीशः नसून संपूर्ण पोलीस दलाचा आहे असे असे भावोद्गार काढून त्यांनी मानियार बिरादरी, पोलीस बॉईज व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here