मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. यंदाही महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला असून यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष परशुराम तपासे आणि मनविसे मुंबई विद्यापीठाचे उपाध्यक्ष किरण मर्चंडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महापालिकेत यंदाही शिवसेनेचा भगवा फडकणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे महापालिका निवडणूक युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून, इतर पक्षातील नेत्यांना, युवा कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष परशुराम तपासे आणि मनविसे मुंबई विद्यापीठाचे उपाध्यक्ष किरण मर्चंडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विद्यापीठातील राजकारणात सक्रिय नेते शिवसेनेत दाखल झाल्याने मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच मनसेचे अनेक नेते आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहितीही पुढे आली आहे.