Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा
    यावल

    मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा

    saimat teamBy saimat teamSeptember 29, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । हजारो नागरिकांचे आणि दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीचा श्राध्द सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.30सप्टेंबर2021रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    धुनीवाले दादाजी दरबार मनवेल 30सप्टेंबर रोजी सकाळी7 वाजता आरती,8वाजता सेवा, दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी12वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री8वाजता महाआरती व रात्र भर ठिक ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे.

    श्री.रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे काही दिवस वास्तव्य केले आहे.भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीला त्यानी1939या वर्षी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली त्या दिवसापासून मनवेल गावी श्री स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

    वरणपोळी व गंगाफळची भाजी महाप्रसादच्या मेनु आहे.गंगाफळची भाजी प्रसिद्ध असुन कार्यक्रमात आलेले भावीक भाजी प्रसाद म्हणून घरी नेतात व आवडीने खातात.याठिकाणी दिवसभर भावीकांसाठी साकळी या गावात बापु धोबी या दादा भक्त गणासाठी मोफत शिरा वाटप करतात तर महर्षि वाल्मीक मित्र मंडळ मनवेल यांचा मार्फत पोहे वाटप तर चहा वाटप व रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात येत असुन साकळी – मनवेल दरम्यान मोफत प्रवासा करीता वाहन व्यवस्था करण्यात येत असते.या कार्यक्रमासाठी साकळी,शिरसाड,थोरगव्हाण, पथराडे,शिरागड,पिळोदा खुर्द, दगडी या गावातील भावीकांचे सहकार्य लाभते.

    कोवीड १९ चे नियम पाडण्यांचे आवाहन या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भावीकांनी कोवीड19च्या नियमांचे पालन करावे मास्क लावून रांगेत सुरक्षित अंतर ठेऊन दर्शन घ्यावे असे आवाहन श्री. दादाजी भक्तगण मनवेल दगडी गावातील ग्रामस्थांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.