मनपा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सेवा द्या

0
12

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. खासगी रुग्णालयदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. महापालिकेने कोविड केअर सेंटरमध्ये किमान ५० ऑक्सिजन बेडची सुविधा करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक महेश चौधरींनी आयुक्तांकडे केली.
होम क्वारंटाइनसाठी रुग्णांचे हाल होत असल्याने पूर्वीप्रमाणे त्या-त्या भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना अधिकार प्रदान करण्याची विनंती केली आहे. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड सेंटर व रुग्णालयांत गर्दी झाली आहे.खासगी रूग्णालये फुल झाल्याने ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांची फरपट होत आहे. अशा अवस्थेत मनपा कोविड केअर सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेडची सुविधा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here