भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आयुक्तांच्या चौकशीसाठी अमोल कोल्हे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
3

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आयुक्तांच्या चौकशीसाठी अमोल कोल्हे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागात भ्रष्टाचार , अनागोंदी कारभार सुरू असुन अजेंट सक्रिय आहे व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू आहे असा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केलेला आहे . तसेच त्यांनी या भ्रष्टाचार व त्रासाविषयी आवाज उचलण्याचे जळगावकर जनतेला जाहीर आवाहन देखील केलेले आहे . वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेले अभियंता व कर्मचारी यांच्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता वाढते म्हणुनच यासंदर्भात छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी देखील वर्षभरापूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलेले होते .

सदर निवेदनात ते म्हणाले होते की , जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभाग हा भ्रष्ट कारभाराबाबत नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे . सद्यकाळात नगररचना विभागातील इंजिनिअर हे ज्या प्रकरणात विशिष्ट कमाई होत नाही त्या प्रकरणात स्वारस्य घेत नाहीत व संबंधित जागा मालकास अपमानाची वागणूक देतात. सर्वसामान्य नागरिक प्रकरणासाठी नगररचना विभागात जातो तेव्हा असे दिसुन येते की , धनाढ्य बिल्डर्सची प्रकरणे तीव्र गतीने पुढे सरकत असतात .मात्र सर्वसामान्य जनतेची हेटाळणी केली जाते . अनेक इंजिनियर या विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडुन बसलेले आहेत . भ्रष्टाचाराला उत्तेजना मिळु नये म्हणून शासनाच्या कार्यप्रणाली नुसार नगररचना विभागात 1 वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झाल्यास इंजिनिअरची अभियंत्याची बदली केल्यास भ्रष्टाचार वाढणार नाही . तरी सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

नगररचना विभागातील नागरिकांना होणारा त्रास व भ्रष्ट कार्यपद्धती दूर व्हावी म्हणून छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी 1 वर्षापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलेले होते . परंतु आयुक्त महोदयांनी सदर निवेदनाची कुठलीही दखल घेतलेली नाही व आजतागायत निवेदनावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही . सर्व अभियंते आजही त्याच विभागात कार्यरत आहेत . त्यामुळे सद्यस्थितीत नगररचना विभागातील भ्रष्ट कारभाराबाबत जो आरोप झालेला आहे , त्यास आयुक्तांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पाठिंबा असल्याचे दिसुन येते . तरी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी निवेदनाद्वारे केलेली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here