जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव च्या अंतर्गत राष्ट्रीय कला मंच जळगाव येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय,भुसावळ आणि अ भा वि प अंतर्गत राष्ट्रीय कला मंच, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय
विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगम
दिनांक २३ रोजी उद्घाटक व समारोपसाठी सुप्रसिद्ध कवि अशोक कोतवाल, प्रमुख पाहुणे प्रसाद जाधव ,(राष्ट्रीय सह संयोजक राष्ट्रीय संयोजक ) प्रा डॉ सुनील कुलकर्णी (अभाविप जळगांव जिल्हा प्रमुख) कार्यक्रमाचे अध्यक्ष सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक उपस्थित होते. तसेच भुसावळ शहरांमध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर पथनाट्य सादरीकरण केले या वेळेस विभागीय पोलीस अधिक्षक सोमनाथ चौरे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
अशोक कोतवाल:- व्यक्तीची आवड, छंद, चांगले विचार त्याचा ध्यास घेतला तर पारंगत होतो, चांगले दिसण्यापेक्षा चांगले विचार महत्त्वाचे असतात त्यामूळे कायम लक्ष केंद्रित होत असते, लोकांच्या जीवनात बदल होण्यासाठी ग्रंथाचा वाटा मोठा असतो, खान्देशातील कवि के नारखेडे, भालचंद्र नेमाडे, बहिणाबाई चौधरी, ना धों महानोर, बालकवी ठोंबरे यांचे लेखनावर प्रेरणादायक भाष्या केले, जीवनात कला गुणांना वाव देण्यासाठी व्यक्त होण्यासाठी संधी मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले,
प्रसाद जाधव:- प्रतिभा संगम कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला की नवोदित साहित्यक यांना वरिष्ठ साहित्यक सोबत मार्गदर्शन मिळणार आहे व जिल्हा ते राष्ट्रीयस्तरा पर्यत सहभागी होणाऱ्या कलावंताना फायदा होईल असे सांगितले
प्राचार्य डॉ आर पी फालक:- अध्यक्षीय भाषणात सांगितले की वेगा पेक्षा दिशा महत्वाची असते प्रत्येकाला साहित्य देणगी म्हणून मिळत नाही कला हा उपजत गुण आहे त्याला वाव दिला पाहिजे असे साहित्य संमेलन आयोजित करून संधी उपलब्ध होत असते
यावेळी संकेत वरूळकर यांनी कथक नृत्य व गणेश वंदना सादर केली
समारोप प्रसंगी मंचावर कार्यक्रम प्रमुख भूमिका कानडे, महाविद्यालयाचे प्राचार्य फलक सर,प्रा डॉ सुनील कुलकर्णी, प्रसाद जाधव, अशोक कोतवाल, हे उपस्थित होते. प्रा. डॉ.सुनील कुलकर्णी यांनी अ भा वि प च्या कार्याचा आढावा घेतला तसेच विद्यार्थी साहित्य संमेलन नंतर होणाऱ्या 10 दिवशीय कार्यशाळेची माहिती दिली कवितांचा जन्म व सृजनशीलता यावर विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
यामध्ये मराठी कविता, हिंदी कविता, वैचारिक लेख, ललित लेख, ब्लाँग, कथा, व पथनाट्य यावर स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले या मध्ये 64 स्पर्धक सहभागी झाले होते.यात खालील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, पुस्तके, पुष्पगुच्छ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आलीत तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या एकूण दहा टक्के विद्यार्थ्यांना प्रांत स्तरीय साहित्य संमेलनात सहभागी करण्यात येणार आहे.
हिंदी कविता:- प्रथम:- निर्वाळ आदित्य आनंदराव,
द्वितीय:- चंचलसंगीता सुनील धांडे
तृतीय:- पाटील गायत्री सुकलाल व मीनाक्षी ठाकूर
मराठी कविता:-
प्रथम:- यश तावडे
द्वितीय:- स्वप्नील जाधव व सागर कोळी
तृतीय:- चंचलसंगीता सुनील धांडे
ब्लॉग लेखन:- चंचलसंगीता सुनील धांडे
वैचारिक लेखन:-
प्रथम:- चंचलसंगीता सुनील धांडे
द्वितीय:- वरून अनिल कुलकर्णी
तृतीय:- राहुल अनिल सुल्ताने
कथाकथन:-
प्रथम:- मीनाक्षी राजेंद्र ठाकूर
द्वितीय:- चंचलसंगीता सुनील धांडे
तृतीय:- विकास प्रमोद पंडित
ललित लेखन:-
प्रथम:- चंचलसंगीता सुनील धांडे
द्वितीय:- मानसी गोपाळ शर्मा
पथनाट्य:-
प्रथम:- एम जे महाविद्यालय, जळगांव
द्वितीय:- गरुड महाविद्यालय शेंदुरणी
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, परिचय व स्वागत उत्कर्ष भंडारी,
प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख भूमिका कानडे, यांनी केले.
आभारअभाविप भुसावळ जिल्हा संयोजक कल्पेश सोनवणे व प्रा डॉ एस व्ही बाविस्कर यांनी केले परीक्षक म्हणून संजयसिंग चव्हाण, प्रशांत ठाकूर, प्रा गिरीश कोळी, विनोद भालेराव, प्रा कुसुमबीवाल, अनिल जटाळे, शैलेंद्र वासकर, सुहास चौधरी, प्रा डॉ दिनेश पाटील, प्रा डॉ भारती बेंडाळे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
प्रा अंजली पाटील,
प्रा ए आर सावळे, प्रा डॉ जे बी चव्हाण प्रा डॉ माधुरी पाटील प्रा डॉ एस व्ही बाविस्कर, प्रा एस डी चौधरी प्रा डॉ जी पी वाघुळदे, प्रा डॉ आर बी ढाके, प्रा डॉ भारती बेंडाळे, प्रा निर्मला वानखेडे प्रा डॉ शोभा चौधरी
प्रा डॉ डी एस राणे प्रा ए जी नेमाडे, प्रा डॉ एस डी चौधरी प्रा के व्ही धांडे,
प्रकाश चौधरी, राजेश पाटील, सुधाकर चौधरी, प्रकाश सावळे अ भा वि प जिल्हा संघटन मंत्री प्रसाद भापकर यांनी परिश्रम घेतले.
अभाविपचे जळगाव कार्यालय मंत्री सारंग कोळी.