भुसावळ ः प्रतिनिधी
तालुक्यातील भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेतर्फे येथील संतोषी माता हॉलमध्ये पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोजक्या वर्हाडींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमात एका प्रज्ञाचक्षू जोडप्याचाही समावेश होता. अवाजवी खर्च टाळण्यासाठी हा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला.
भोरगाव लेवा पंचायतीतर्फे भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये सामूहिक विवाह पार पडला. यात लोकेश कोल्हे व राजश्री चौधरी, कौतिक भारंबे व विनीता चौधरी, अक्षय फेगडे व विशाखा चौधरी, हर्षल चौधरी व विजया भोसले तर प्रज्ञाचक्षू जोडपे दीपाली बाळू उबाळे व मंगेश अशोक धिवरे या जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. यावेळी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश पाटील, प्रकल्प चेअरमन आरती चौधरी, मंगला पाटील, ऍड.प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, सुहास चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, शरद फेगडे, अजय भोळे, महेश फालक, परीक्षित बर्हाटे, डिगंबर महाजन आदी उपस्थित होते. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून हा सोहळा झाला.
या विवाह सोहळ्याला केवळ ५० जणांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यामुळे सर्व संचालकांचे कौतूक होत आहे. विवाह सोहळ्यासाठी किशोर शिंपी, राजेंद्र फेगडे, दिनेश राणे, संतोष टाक, सुरेश जावळे आणि महाराष्ट्र राज्य विज कामगार संघटनेचे सहकार्य लाभले. यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यात वैदिक पद्धतीने वधू-वरांचे विवाह झाला. संस्थेतर्फे प्रत्येक जोडप्याला गॅस शेगडी, मिक्सर आदी संसारोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. नवीन जोडप्यांना ११ हजार रुपये किमतीच्या वस्तू आयोजकांनी भेट स्वरुपात दिल्या आहेत.