जळगाव : प्रतिनिधी
शासकीय जमिनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका अध्यादेशाद्वारे तुर्त स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात त्वरीत करण्यात यावी, असे महाराष्ट्र शासनाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी अध्यादेशात म्हटले
आहे.
शासनाने भाडेपट्ट्याने अथवा कब्जे हक्काने प्रदान केलेल्या भोगवटदार वर्ग-२ शासकीय जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याच्या कारवाईस राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र जमिन महसुल नियम २०१९ संदर्भाधिन अधिसुचनेद्वारे हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सदर स्थगिती आदेशाचा अंमल तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती येथील एन.रामाराव गृहनिर्माण संस्थेचे सचिव डी.एम. अडकमोल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.