भुसावळ रेल्वेचे दहा कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान

0
4

भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या 10 कर्मचार्‍यांना (तीन मुंबई विभागातील, प्रत्येकी दोन नागपूर, पुणे आणि भुसावळ विभागातील आणि एक सोलापूर विभागातील) त्यांच्या सतर्कतेचे कौतुक म्हणून महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान केला. डिसेंबर 2021 या महिन्यामध्ये अनुचित घटना टाळण्यासह रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या सतर्क कार्याची दखल घेत सोमवार, 3 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले.

पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्रक व दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारार्थी कर्मचार्‍यांमध्ये सोपान पेढेकर (मास्टर क्राफ्ट्समन, कॅरेज आणि वॅगन वर्कशॉप, मुंबई विभाग), एस.के.ताराई (लोको पायलट), सुभाषकुमार यादव (सहाय्यक लोको पायलट, दोघेही मुंबई विभाग), स्वप्नील सुरेश (पॅट्रोलमन, बडनेरा, भुसावळ), वसंता प्रभाकर (गेटमन, बोदवड, भुसावळ), राकेश कुमार (वरीष्ठ गुड्स गार्ड, नागपूर विभाग) उमेशकुमार डोंगरे (ट्रॅकमन, वर्धा, नागपूर विभाग), अजय कुमार (डेप्युटी स्टेशन मॅनेजर, हडपसर, पुणे विभाग), कृष्णा बसाक (कीमॅन, चिंचवड, पुणे विभाग), जितेंद्र कुमार (गुड्स गार्ड, सोलापूर विभाग) यांचा समावेश आहे.

अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले असून संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचार्‍यांनी दाखवलेली सतर्कता सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या संरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल. या कार्यक्रमास अतिरीक्त महाव्यवस्थापक बी.के.दादाभोय, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी विवेक गुप्ता, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक मुकूल जैन, अश्वनी सक्सेना प्रधान मुख्य अभियांत्रिकी आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here