भुसावळ येथे एका महिलेचा अत्याचार करून निर्घृण खून

0
37
पाटणा देवी येथे ५० वर्षीय व्यक्तीचा खून, चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात आज सकाळी मच्छी मार्केट परिसरात एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त होत असतांनाच आज एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी आरपीडी रोडवरील मच्छी मार्केटच्या परिसरात एका महिलाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. या महिलेची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तिच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून येत असून शारीरीक अत्याचार केल्यानंतर तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही महिला नेमकी कोण आणि कुठली रहिवासी ? याबाबतची माहिती अद्यापही पोलिसांना मिळालेली नाही. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. भुसावळ शहरातील गुन्हेगारी ही अनेकदा चर्चेचा विषय होत असते. अगदी अलीकडेच उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात देखील याचा उल्लेख झाला होता. शहरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here