भुसावळ येथील खून संशयातूनच, आरोपी पती अटकेत

0
30

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा खून हा संशयातूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात आरोपी पतीला बाजार पेठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळातील कवाडे नगरातील रहिवासी असलेल्या सुचिता शुभम बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे सपासप दहा वार करून व नंतर गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल केली असून मृत महिलेचा आरोपी पती शुभम चंदन बारसे (26, कवाडे नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचाच पतीला संशय असल्याने त्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपी पतीविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निर्जन जागी पत्नीला नेत केला खून
भुसावळ पालिकेत कंत्राटी पद्धत्तीने कामास असलेल्या शुभम बारसे या संशयीत आरोपी पतीने पत्नी सुचिता बारसे (25) हिला तिच्या मैत्रीणीच्या घरी गाठत घरी नेत असल्याचे सांगून मंगळवारी रात्री आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात नेले. यावेळी चाकूचे सपासप दहा वार करण्यात आले तसेच गळा आवळून पत्नीचा खून करण्यात आला. घटनास्थळावरून आरोपीने लागलीच पळ काढला. बुधवारी पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली. काही वेळेतच उपस्थित नागरीकांच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत व अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here