भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील न्यू एरिया वार्ड परिसरात ग्रीन कोरिडोरला मंजुरी देण्याची मागणी या परिसरातील काही सामाजिक संस्थांनी व नागरिकांनी केली आहे.सामाजिक बांधिलकी जोपासणार्या श्री रिदम रुग्णालयाने आपत्तीच्या काळात नेहमीच रुग्णसेवा तत्परतेने देण्यासाठी सातत्याने सतर्कता दाखविली असून रुग्णसेवेत अडथळा येऊ नये तसेच विलंब होऊ नये म्हणून संतोषी माता सोसायटीपासून आयडीबीआय बँकेपर्यंत किंवा हॉटेल अनिलपासून रिदम रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर ग्रीन कोरिडोरला मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात गेल्या जून महिन्यात श्री रिदम रुग्णालयाने एक निवेदन जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकार्यांना देऊन अशी मागणी केली होती मात्र कोरोना संकटामुळे हा विषय तूर्त मागे पडला होता.आता कोरोना संकटाचे ढग ओसरले असून या मागणीकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष देऊन न्यु एरिया वॉर्ड परिसरात ग्रीन कोरिडोरला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.