भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या चारवरुन पाचवर पोहोचली आहे. दरम्यान, विभागातील यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या चार तालुक्यात मात्र एकही नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला.
शहरात बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन हाेत नसल्याने पुन्हा काेराेना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली अाहे. त्याची अाता दखल न घेतल्यास रुग्णसंख्या बेसुमार वाढण्याचा धाेका अाहे. नगर पालिका, पाेलिस दलातर्फे नागरिकांना काेराेना प्रतिबंधासाठी शासनाने केलेल्या नियमांचा विसर पडला असून त्यांना जाणीव करून देणे गरजेचे अाहे.