जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नूतन वर्षा कॉलनी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील महाबळ परिसर येथील नूतन वर्षा कॉलनी भागात भारत विकास परिषदेच्यावतीने आज 1 ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत महिलांसाठी लहान मुलांसाठी हिमोग्लोबीन व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. प्रभू व्यास, डॉ. राहुल व्यास, डॉ. योगेश पाटील, डॉ. दिक्षा सिकवाल, भारत विकास परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष उज्वल चौधरी, महिला संयोजिका सीमा महाजन, सचिव उमेश पाटील, सभासद प्रशांत महाजन, राधिका नारखेडे, जानवी खाडिलकर, हेमांगीनी महाजन, शैलेजा कोचर, नाना कोळी आदींची उपस्थिती होती.