भारतीय स्टार्टअप कंपनीने सादर केली डर्ट इलेक्ट्रिक बाइक; एका चार्जवर धावते ११० किमी

0
10

इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी इग्निट्रॉन मोटोकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली दुसरी बाईक लॉन्च केली आहे. भारतीय स्टार्टअप कंपनीने इलेक्ट्रिक डर्ट बाइक सायबॉर्ग Bob-e सादर केली. ही एक स्टायलिश बाइक असून तरुणांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन तयार करण्यात आलं आहे. ही गाडी एका चार्जवर ११० किमी धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सायबोर्ग बॉब-ई इलेक्ट्रिक मोटरसायकल आर्टिफिशियल इंटेलिजेंस-सक्षम तंत्रज्ञान आणि सुधारित सुरक्षा फिचर्ससह तयार केली आहे. स्टार्टअपचा असा दावा आहे की ही इलेक्ट्रिक डर्टबाईक तरुण पिढीच्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही गाडी दोन रंगाच्या पर्यायमध्ये उपलब्ध असून काळा आणि लाल रंगात येते. ही गाडी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम आहे.

सायबॉर्ग बॉब इ बाईकमध्ये २.८८ केडब्ल्यूएचचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. लिथियम-आयन बॅटरी पोर्टेबल, हवामान-प्रतिरोधक आणि स्पर्श-सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. ही बाईक ताशी ८५ किमी वेगाने धावू शकते. एका चार्जवर जास्तीत जास्त ११० किमीपर्यंत पोहोचण्याचा दावा करते. यात जिओफेन्सिंग, बॅटरीची स्थिती, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस इग्निशन इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. यामुळे चालकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. यात एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे जो विविध प्रकारची माहिती दाखवतो. तसेच, यामध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्टी असे तीन वेगवेगळे रायडिंग मोड उपलब्ध आहेत. यात रायडरच्या सोयीसाठी रिव्हर्स मोड आणि क्रूझ कंट्रोल देखील मिळतो. या बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस पूर्णपणे समायोजित करण्यायोग्य एडजस्टेबल मोनोशॉक एब्जॉर्बरचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here