जामनेर, प्रतिनिधी । जामनेर शहरातील विश्रामगृहात भारतीय भटके-विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगाव कर यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर तालुका बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जामनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी तुकाराम काळे तर उपाध्यक्षपदी उस्मान भाई गॅरेज वाले सांडू तडवी सरचिटणीस पदी पत्रकार गणेश पांढरे सचिव सुरेश काळे सहसचिव गोविंदा रूम कोषाध्यक्ष कडोबा नवघरे जामनेर शहर अध्यक्षपदी अमोल लोहार तर उपाध्यक्षपदी न्यानेश्वर ताठे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या बैठकीसाठी संदीप काळे गणेश काळे अमोल लोहार उस्मान शेख तुकाराम काळे संदीप काळे ईश्वर काळे अतुल महाजन गोविंदा लोहार सांडू तडवी गणेश पांढरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिसेंबर अखेर मुंबई ते मंत्रालय 100000 बांधवांचा मोर्चा नेण्याचा मानस असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले
