भारतीय बॅडमिंटनला कोरोनाचा हादरा, सात खेळाडू पॉझिटिव्ह

0
12

भारताच्या बॅडमिंटन (Indian Badminton) क्षेत्राला कोरोनाने जबरदस्त हादरा दिला आहे आणि इंडियन ओपन स्पर्धेत खेळणारे तब्बल सात भारतीय बॅडमिंटनपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यात किदांबी श्रीकांत व अश्विनी पोनप्पा  सारख्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे.

 

या खेळाडूंनी मंगळवारी RT-PCR चाचणी केली होती आणि तिचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला आहे अशी माहिती भारतीय बॅडमिंटन महासंघाने दिली आहे.

बाधा झालेली आढळून आलेल्या खेळाडूंमध्ये अश्विनी पोनप्पा, रितिका ठाकरे, त्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंघीआणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी आता इंडिया ओपन स्पर्धेतून माघार घेतलेली आहे.

या खेळाडूंचे दुहेरीतील साथीदार असलेल्या खेळाडूंनीही इंडिया ओपन मधून माघार घेतलेली आहे. ते पॉझिटिव्ह नसले तरी क्लोज कॉन्टॅक्ट म्हणून ते खेळू शकणार नाहीत. यात एन. सिक्कीम रेड्डी, ध्रूव कपिला, एम.आर. अर्जुन, अक्षन शेट्टी, उत्कर्ष अरोरा, साई प्रतिक,. गायत्री गोपीचंद, काव्या गुप्ता यांचा समावेश आहे.

माघारीनंतर ड्रा मध्ये या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात येणार नाही तर त्यांच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी खेळाडूंना विजय घोषित करण्यात येईल असे भारतीय बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले आहे. स्पर्धेत पहिल्या फेरीचे सामने झालेले असल्याने ते आता शक्य नाही परंतु या खेळाडूंनी सामने खेळलेले असल्याने आणि त्याआधी सोबतच सराव केलेला असल्याने आयोजकांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

या स्पर्धेच्या आरंभीच साई प्रणित, मनू अत्री आणि ध्रुव रावत हे पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले नव्हते. इंग्लंडच्या संघातील दुहेरी चा खेळाडू सील वेंडी आणि प्रशिक्षक रोबर्टसन हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर इंग्लंडच्या पूर्ण चमूने इंडिया ओपन मधून माघार घेतली होती.

याप्रकारे सुपर ५०० दर्जाची ही स्पर्धा कोरोनामुळे अतिशय प्रभावित झालेली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव हॉलमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. कोविड च्या नियमावलीनुसार सर्व खेळाडूंच्या हॉटेलात आणि स्टेडियम बाहेर दररोज चाचण्या करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here