चोपडा ः प्रतिनिधी
भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नंदलाल मराठे तर जिल्हा सरचिटणीसपदी संजीव शिरसाठ यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांनी सदर निवडीचे पत्र दिले असून सन-२०२३ पर्यंत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात गेली २१ वर्षांपासून नंदलाल मराठे हे कार्यरत आहेत.चोपडा तालुका पत्रकार संघ,जिल्हा पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र पत्रकार संघ आदी संघटनेत त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांनी सदरील निवड केली आहे. संजीव शिरसाठ यांनी देखील दीर्घकाळ पत्रकारिता केली असून महाराष्ट्र पत्रकार संघाचे ते पदाधिकारी होते.साप्ताहिक चौखंबा व खान्देश अस्मिता न्युजचे ते कार्यकारी संपादक आहेत. तर नंदलाल मराठे हे संपादक आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लवकरच बैठका घेऊन नूतन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात येऊन भारतीय पत्रकार महासंघाच्या संघटन व पत्रकारांच्या समस्यांच्या भूमिकेविषयी धोरण स्पष्ट केले जाणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे व जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार सौ.लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीपभैय्या पाटील,गटनेते तथा नगरसेवक जीवनभाऊ चौधरी, भाजपाचे शहर अध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,माजी शहरप्रमुख राजुभाऊ शर्मा,भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष राकेशजी कोल्हे,जयंतआप्पा देवरे दिल्ली, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील,केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, केंद्रीय सदस्य शिरीष शिसोदे,शकील पटेल,रियाज शेख,सुरेंद्र पालवे आदींनी अभिनंदन केले आहे.