भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे स्व. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

0
26

जळगाव, प्रतिनिधी । येथील काव्यरत्नावली चौकात भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल जळगाव महानगर व जळगाव ग्रामीण यांच्यातर्फे स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी जळगावातील रंगकर्मी विनोद ढगे, दीपक पाटील ,रवी परदेशी तसेच भारतीय जनता पार्टीचे महेश जोशी जिल्हा सरचिटणीस ,नितीन इंगळे जिल्हा सरचिटणीस ,दिप्ती ताई चिरमाडे महिला आघाडी अध्यक्ष, रेखा वर्मा सरचिटणीस महिला आघाडी, उज्वलाताई बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी, ॲड. शुचिता हाडा नगरसेविका, गायत्री राणे नगरसेविका सुरेखा तायडे नगरसेविका व इतर नागरिक उपस्थित होते तसेच जळगावचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांनी दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आणि महानगर अध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी यांनीही दीदींना श्रद्धांजली अर्पण केली.

श्रद्धांजलीपर भाषणात ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांनी लतादीदींची पोकळी न भरून निघणारी आहे तसेच दीपक पाटील यांनी लतादीदींचा आवाज हा अजरामर आहे तसेच दीप्ती तार्इंनी लतादीदी या गाण्याच्या रूपात नेहमी आपल्या सहवासात आहेत तर विशाल जाधव यांनी लतादीदी या पुढच्या अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर राज्य करणारा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी भाजपा सांस्कृतिक सेलचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव महानगर संयोजक भावेश पाटील, योगेश लांबोळे, रुपेश पाटील ,तेजस कोठावदे, नेहा वंदना सुनील, तृप्ती जोशी, प्रणिता शिंपी , पूर्वा जाधव समर्थ जाधव ज्ञानेश्वर पाटील इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here