जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.तसेच महामारीमध्ये कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण आणि मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी महामारीच्या या काळात केंद्रसरकारने घेतलेल्या जनहीतातल्या सर्व योजना (उज्वला गॅस,जनधन खात्याद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य, मोफत लसीकरण,मोफत धान्य वाटप) या बद्दल मोदी साहेबाना पत्र पाठवून नागरिकांनी आभार मानले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, उपाध्यक्ष राहुल मिसतरी, स्वामी पोद्दार, सचीन बाविस्कर, चिटणीस सागर जाधव, प्रतीक शेठ, अबोली पाटील, काजल कोळी, मंडल अध्यक्ष, महेश लाठी, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, पंकज सनस, निखिल सूर्यवंशी, मंडल चिटणीस आकाश चौधरी, भूषण आंबिकार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.