जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी जेष्ठ नागरिक आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे व जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठीकीच्या सुरवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष सुरेश सोनार यांनी केले. तसेच जळगाव महानगराच्या ९ मंडलाची रचना विशद केली. जेष्ठ नागरिक आघाडीच्या माध्यमातून जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिक बंधू-बघिनिना विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या यामध्ये सहकार्य, मदत करून समाजाची सेवा करण्याची रचना करण्यात आली.
जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक तसेच विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामे यामध्ये मदत करणे, त्याच बरोबर केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मदत करणे. या उद्देशाने जेष्ठ नागरिक आघाडी कार्यरत राहणार आहेत. या बैठकीतच जेष्ठ नागरिक आघाडीची महानगर कार्यकारिणी आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले.
जेष्ठ नागरिक आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश सोनार, सरचिटणीस सुभाष चौधरी, उपाध्यक्ष विजय वाडकर, संघटन मंत्री माधव कुलकर्णी, कोषाध्यक्ष तुळशीराम मोरे, कार्यकारणी सदस्य म्हणून कैलास तिवारी, लक्ष्मणगीर गोसावी, व्ही. डी. भावसार, प्रभाकर तायडे आदींची निवड करण्यात आली आहे. तसेच निवड झालेल्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे आ. राजूमामा यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांनी बैठकीस संबोधित करताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. त्या माध्यमातून समाजाच्या गरजेच्या व सुख दुखःच्यावेळी आपण धावून जाणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेल्या समाज उपयोगी उपक्रम, योजना यांची सविस्तर माहिती तसेच नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातील योजनांची माहिती यावेळी दिली.
या बैठक प्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेष्ठ नागरिक आघाडीच्या वतीने जळगाव महानगरातील अवास्तव व प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या घरपट्टी संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबवून मनपाचे महापौर आणि आयुक्त यांना निवेदन देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरातील तमाम नागरिक बंधू-बघिनिनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या वरील अन्यायच्या विरोधात आवाज उठवावा असे आवाहन करण्यात येत आहे. बैठीकीचा समारोप माधव कुलकर्णी यांनी केला. व आभार सुभाष चौधरी यांनी मानले.