भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक संपन्न

0
17

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हा व महानगर जिल्ह्याच बैठक भाजपाचे नेते व मा.मंत्री आ.गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या अध्यक्षतेखाली जी.एम.फाउंडेशन येथे संपन्न झाली.

सदर बैठकीत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या अभिनंदनाचा ठराव जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी मांडला. यावेळी ठराव मांडतांना खा.उन्मेषदादांनी सांगितले की, आज भारत देश हा महासत्तेकडे जाताना दिसत असून मोदींचे नेतृत्व हे जगमान्य झाले.

त्याच प्रमाणे चाळीसगाव चे आमदार मंगेश दादा पाटील यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविषयी ठराव मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की, आज पोलिसलाच सरकारच्या मंत्रीचा शोध घेण्याचे काम करावे लागत असल्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीक्न की गुन्हेगारांचे सरकार असे आज दिसत.

यानंतर भुसावळ चे आमदार संजय सावकारे यांनी राजकीय ठराव मांडत असतांना आज आरक्षण व शेतकऱ्यांच्या, कामगारांचे प्रश्न याकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष वेधण्याचे काम हे सरकार करत आहे, असे सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे विभागीय संगठन मंत्री रविजी अनासपुरे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमची माहिती दिली. त्यात लसीकरणाचे १००% पूर्ण करण्यासाठी जिल्हाभरात आरोग्य रक्षक काम करतील. घरोघरी जाऊन १००% लसीकरण करून घ्यावे. प्रत्येक गावात २६ नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करावा.

या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान गौरव रथाचे उद्घाटन मा.मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) आणि अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.

सदर बैठकीचा समारोप भाजपा नेते माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांनी करताना आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्ते जनतेत जाऊन केंद्रसरकार व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांची कामगिरी जनतेत सांगा व आज चे महाराष्ट्राचे सरकार व आपले नेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार यांची तुलना आपण जनतेत करावी व शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर आक्रमण झाले पाहिजे.

सदर बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.स्मिताताई वाघ, जि.प.अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील, माजी आमदार डॉ.डी.एस.पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, माजी जि.प. अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, डॉ.राजेंद्र फडके, जि.प.उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, के.बी. साळुंखे, पद्मकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्रदेश पदाधिकारी, त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.

सदर बैठकीचे प्रास्ताविक जळगाव महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी मांडले. तर सूत्र संचलन जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील व मधुकर काटे यांनी केले. आणि महानगर सरचिटणीस राजेंद्र घुगे पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here