आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भारत सरकारवर कडक टीका होत असताना, राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बीबीसी’ (BBC) सारखे नवे चॅनेल सुरू करण्याची योजना आखली आहे. याच पार्श्वभूमीवर सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या अधिकाऱ्याने याबाबत इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निविदा काढण्यात आली आहे. आणि बर्याच वर्षांपासून यावर विचार सुरू होता.
१ मे रोजी सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. दूरदर्शनला जागतिक स्तरावर नेण्यासाठी डीडी इंटरनॅशनलची स्थापना करण्यात आली आहे. ‘प्रख्यात जागतिक सल्लागारांकडून या प्रकल्पाबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारणकर्त्यांना / मीडिया हाऊसेसना सल्ला देण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) जारी केला जात आहे.’ निविदेनुसार, जागतिक आणि देशांतर्गत महत्त्व असलेल्या समकालीन मुद्द्यांवरील जागतिक पातळीवर भारताचा दृष्टिकोन दर्शविणे आणि जागतिक प्रेक्षकांना भारताचा दृष्टिकोन सांगणे होय.
प्रसार भारतीने जगभरात ब्यूरो नेमण्याचा विचार केला आहे आणि सल्लागारांना ठिकाण निश्चित करून रोडमॅपची योजना तयार करावी लागणार आहे. सातही दिवस २४ तास जागतिक सेवा देण्यासाठी योजना आखली जात आहे. प्रसार भारतीला डीडी इंडियाच्या धर्तीवर ग्लोबल न्यूज सर्व्हिससाठी धोरणात्मक रोडमॅपदेखील हवा आहे. आंतरराष्ट्रीय माध्यम कोविड -१९ साथीच्या दुसर्या लाटेत मिळालेले अपयश आणि लस धोरणावर सरकार टीका करत आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, प्रसार भारती मंडळाने मार्चमध्ये या प्रकल्पाला मान्यता दिली होती. २५ मार्च रोजी दूरदर्शन इंटरनॅशनल फॉर प्रोजेक्टचा ब्लू-प्रिंट विकसित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.