जळगाव, प्रतिनिधी । आज भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती वसंतस्मृती भाजपा कार्यालय जळगाव येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी,प्रमुक वक्ते सुरेश कुलकर्णी,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक साखरे यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते सुरेश कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेले स्वराज्य निर्मितीचे ध्येर्य आणि पाश्चात्य देशात भारतीय संस्कृतीची ओळख या विषयावर व्याख्यान केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात युवकांना महापुरुषांनी दिलेली प्रेरणा आचरणात आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले तसेच समाजाला अपेक्षित संस्कृती पुन्हा जागृत करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी, सरचिटणीस मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, जयेश भावसार ओबीसी मोर्चा अध्यक्ष, महेश चौधरी नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, उपाध्यक्ष गणेश महाजन, रियाझ शेख, राहुल लोखंडे, जयेश ठाकूर, गणेश महाजन, चिटणीस जयंत चव्हाण, रोहित सोनवणे, सागर जाधव, युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, सोशल मीडिया प्रमुख पुष्पेंद्र जोशी, बाळू मराठे ,सागर पोळ, निखिल सुर्यवंशी, हर्षल चौधरी, आकाश चौधरी, निर जैन, गौरव दुसाने ,महिला अनुसूचित आघाडी अध्यक्ष लताताई बाविस्कर, ओबीसी महिला अध्यक्ष रेखाताई पाटील, मयूर दाभाडे, आकाश चौधरी, लीलाधर बोरसे, पिनकेश राजपूत, धीरज चौधरी, विपुल तायडे, पंकज टेकावडे, राहुल विसपुते, सारंग सोनार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.