भाजप कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी

0
74

पुणे : राजकरणात एकमेकांचे विरोधक असलेले भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांचा घरोबा नुकताच पाहायला मिळाला. कितीही मतभेद असले तरी तेही राजकारणापुरतेच मर्यादित आहेत. याचीच प्रचिती भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यालयात उपस्थितीत लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकतीच याबाबत फेसबुकपेजच्या माध्यमातून माहिती दिली.

 

जगताप पोस्टमध्ये म्हणाले की, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमचे स्वागत केले. दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी मनभेद मात्र नाही. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि शहर विकासासाठी सलोखा ही पुण्याची राजकीय संस्कृतीच आहे. आज या संस्कृतीचे पुन्हा एकद दर्शन झाले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना तिळगुळाचे लाडू भरवत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात आमदार सुनील आण्णा टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी अध्यक्ष रवींद्र माळवदकर, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे आदी उपस्थित होते. इतकेच नाही तर या कार्यक्रमात मनसेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

तसेच राजकरणात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही सर्व पुणेकर या भावनेने एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया जगदीश मुळीक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here