जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी भाजपने त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकार्यांचे पथक सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भेटले. पक्षातर्फे त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असताना जिल्हातील आरोग्य यंत्रणेत मात्र अनेक त्रृटी आहेत. जिल्ह्यात पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, रेमडीसिवीर इंजेक्शन नाहीत. रुग्णांना इंजेक्शन मिळावे म्हणून जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार त्यांचा संपूर्ण आमदार निधी देण्यासाठी तयार आहेत. यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून चर्चा केली.
आमदार स्मिताताई वाघ, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे,माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सचिन पानपाटील, प्रल्हाद पाटील, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, वैद्यकीय आघाडीचे डॉ. नरेंद्र ठाकुर, डॉ.धर्मेंद्र पाटील, आरिफ शेख व पदाधिकारी उपस्थित होते.