जळगाव, प्रतिनिधी । आज दि. १२ मंगळवार रोजी जी.एम. फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा), महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, युवा मोर्चा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अक्षय जेजुरकर व युवा मोर्चा मंडल क्र.३ तर्फे आयोध्या नगर कासार मंगल कार्यालयात येथे भव्य कोव्हिड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
नगरसेवक डॉ.विरण सूरेश खडके, श्री.प्रदिपजी रोटे, निखील सूर्यवंशी, भुषण भोळे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मू कश्मिर येथील रजौरी सेक्टर मध्ये येथे शहीद झालेल्या अमर जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली देवून शिबिरस सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातिल ६७८ नागरिकांनचे लसीकरण करण्यात आले. परिसरातील अयोध्या नगर नवदुर्गउत्सव मित्रमंडळाचे विशेष सहकार्यने लसीकरण मोहीम पार पडली.
सदर कार्यक्रम सागर बोरोले, अमेय राणे, चेतन कोळी, भावेश जैन, मयुर अत्तरदे, नरेंद्र महाजन, पराग चिरमाडे, धर्मेंद्र धांडे, राहुल कोठावदे, कोमल तळेले, नीर जैन, शूभम वानी, शिवा कांडारे, महेश राठी यांच्या प्रयत्नामुळे यशस्वीरित्या पार पडला.