भाजपाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत समारोप

0
7

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर अभ्यास वर्ग आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्ग शिबिरात दुसऱ्या दिवशीच्या पाचवे सत्रात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सोशल मीडियाचा प्रसार या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सहावे सत्रात तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर यांनी भारताची वाढती सुरक्षा व सामर्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात आमदार मा.राजुमामा भोळे यांनी प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेऊन आगामी काळात अधिक क्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ३६५ दिवस कार्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आगामी काळात नगरपरिषद, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन यावेळी केले.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, विभाग संघटन मंत्री रविजी अनासपुरे, खा.उन्मेषदादा पाटील, खा. रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रशिक्षण वर्ग प्रमुख पोपट तात्या भोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, महेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, गोविंद अग्रवाल, जिल्हा परिषद सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, विद्या दिलीप पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन, आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्षा दीप्तीताई चिरमाडे, रेखाताई पाटील, व्यवस्था प्रमुख राजेंद्र घुगे पाटील लोकप्रतिनिधी जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी,आघाडीचे अध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन सचिन पानपाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार पोपट तात्या भोळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here