मुंबई, वृत्तसंस्था । गेल्या सात महिन्यातपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून देण्यासाठी कृषि मंत्री यांच्या दालनात अनेक बैठका घेऊन ही विमा कंपनी विम्याचे पैसे देत नसल्याने भाजपचे माजी मंत्री संजय कुठे यांनी मंत्रालयात आंदोलन केले.
यावेळी संजय कुटेनी सांगितले की, माझ्या मतदार सांगतील शेतकरी आर्थिक संकटात आहे. यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे अनेक वेळा बैठक झाल्या 65 कोटी रुपये हे फक्त माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांचे विमा कंपनी कडे घेणे आहेत. मात्र वारंवार बैठक घेऊन ही विमा कंपनी हे पैसे देत नाही. कंपनी सांगते की अगोदर सरकारने आम्हाला आमचे २०० कोटी द्यावेत त्यानंतर आम्ही तुम्हाला विमाची रक्कम देऊ आणि सरकार म्हणते आहे. अगोदर विम्याची रक्कम द्या नंतर पैसे देऊ, कंपनी आणि सरकार यांच्यातील वादात माझ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे सरकार आणि अधिकारी यांना अनेक वेळा सांगून ही ऐकत नसतील तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण या सरकारला शेतकरी आत्महत्या करणार नाही. तेव्हापर्यंत जाग येणार नाही का? यावेळी संजय कुटे यांच्या बरोबर त्यांच्या मतदार संघातील शेतकरी होते.