मुंबई :- प्रतिनिधी
माजी मंत्री आणि भाजपाचे (BJP) प्रमुख नेते आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून याची माहिती देतील.
२०२० मिळाली होती धमकी
आशिष शेलार यांना २०२० मध्ये देखील ठार मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. पुन्हा एकदा आशिष शेलार यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे.
आशिष शेलार हे महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. आशिष शेलार लढवय्ये असल्याने त्यांच्या विरोधात असे प्रकार सुरू आहेत. शेलार यांना आलेल्या धमकीची मुंबई पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केली.