जळगाव ः प्रतिनिधी
खेळाडूंनी कोणताही खेळ चिकाटी व सातत्य ठेवून खेळले व बुद्धिबळसारखा खेळ खेळल्यास खेळाडू हा आपले चांगले करिअर घडवु शकतो त्यामुळे चांगले खेळ खेळा व त्याला आपल्या जीवनात आत्मसात करा असे भावनिक आवाहन जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसंघर्ष मोर्चा आयोजित शिवजयंतीनिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे,सचिन धांडे, डॉ.ए.जी. भंगाळे, डॉ.विकास बोरोले ,साजिद शेख ,अॅड. विजय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख,अंकुश रक्ताळे, अनिस शाह,मुकुंद सपकाळे, विष्णू भंगाळे, अयाजअली, मुकेश टेकवानी, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, स्मिता वेद,प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती.
समारोपीय प्रस्तावना लोक संघर्षाच्या प्रतिभा शिंदे यांनी सादर केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख यांनी केले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू असे ः आठ वर्षे वयोगट – १ परम मुंदळा, २ अजय पाटील जळगाव दहा वर्षे वयोगट – प्रथम तहसीन तडवी जळगाव, द्वितीय -देवाण राजगुरू, मेहकर तृतीय – धैर्य गोला जळगाव, बारा वर्षे वयोगट ः प्रथम जयेश सपकाळे ,जळगाव, द्वितीय- शेरोन ठाकूर, चोपडा तृतीय कोकणे भिवा ,धुळे
पंधरा वर्षे वयोगट ः प्रथम दिघ्नाड वाघ, धुळे, द्वितीय- उज्वल आमले ,जळगाव तृतीय- पूर्वा जोशी जळगाव
उत्कृष्ट महिला गट ः प्रथम क्रमांक काबरा श्रुती, जळगाव, द्वितीय ः भुसावळ गुर्मीत कौर, तृतीय ः धुळ्याची खुशबू कोकाने खुल्या गटातील प्रथम दहा विजयी खेळाडू – प्रथम क्रमांक जळगावची भाग्यश्री पाटील, द्वितीय क्रमांक – जळगाव बुधवंत कासार,तृतीय क्रमांक – औरंगाबाद इंद्रजीत महिंद्रकर चौथा क्रमांक ः नंदुरबार वैभव बोरसे, पाचवा क्रमांक जळगाव केतन पाटील, सहावा क्रमांक नागपूर ईश्वर रामटेके, सातवा क्रमांक जळगाव तेजस तायडे , आठवा क्रमांक ः जळगाव रवींद्र दशपुत्रे नववा क्रमांक ः नंदुरबार ऋषिकेश सोनार, दहावा क्रमांक ः जळगावची सानिया रफिक तडवी. एकूण २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक या खेळाडूंना देण्यात आले या स्पर्धेमध्ये सर्वात लहान खेळाडू म्हणून जळगावचा परम मुंदडा व सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून नागपूरचे ७६ वर्षे वय ईश्वर रामटेके यांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रवीण ठाकरे यांच्यासह फारुक शेख, रवींद्र धर्माधिकारी, परेश देशपांडे ,अंकुश रक्ताळे व शर्वरी दशपुत्रे यांचा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.विजयी सर्व खेळाडूंना उपरोक्त सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.लोकसंघर्ष तर्फे बाहेरून आलेल्या खेळाडूंची राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती.