भर चौकातील फळ विक्रेत्याचा पसारा चालतो कसा ?

0
8

जळगाव : विशेष प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लावल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे . हॉकर्स, फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते यांचेही व्यवहार बंदच आहेत. तरी सुद्धा काही लपून-छपून व्यवसाय करतात , त्यांच्यावर अतिक्रमण विभाग कारवाई करीत आहे. त्यात काहींवर कारवाई तर काहींना सूट दिली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे समजते अर्थात तोंड पाहून कारवाई केली जात असल्याने हातावर पोट भरणारांनी संताप व्यक्त केला आहे . ज्यांची ‘‘टीप‘‘ मिळते त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात असतांना साने गुरुजी चौकातील फळ विक्रेत्यांचा प्रचंड पसारा चालतो कसा असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कडक प्रति- -बंध जारी केले आहेत .जीवनावश्यक वस्तू ,सामान वगळता अन्य दुकाने,बाजारपेठ,व्यापारी संकुले बंद आहेत.त्याचप्रमाणे फळ-भाजीवाले ,हॉकर्स,फेरीवाले,रस्त्याच्या कडेला बसून रोजी रोटी कमविणारांना सुद्धा यात प्रतिबंध आहे.तरीही बरेच लहान-सहान व्यवसायिक लपून-छपून व्यवसाय करून रोजी रोटी चा प्रबंध करीत असताना महापालिका अतिक्रमण विभाग त्यांच्यावर कारवाई करीत आहे .
त्याचप्रमाणे सध्या लग्न सहळ्याच्या बर्‍याच तिथी आहेत.काहींचे विवाह गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वीच ठरलेले आहेत .लग्न समारंभांना २५ लोकांच्या उपस्थितीची परवानगी असली व लोकांना ते मान्य असले तरीही वधु -वरांचे कपडे,दागदागिने खरेदी करणे या कडक प्रतिबंधामुळे अवघड होऊन बसले आहे . वर-वधु पित्यांसमोर हा यक्ष प्रश्न असतांना बरेच लोक ओळखीच्या दुकानदारांशी संपर्क साधून , त्यांना विनंती करून आपली व्यवस्था करून घेत आहेत.म्हणजे दुकानदाराने दुकान उघडायचे , खरेदीदारांना आत घ्यायचे व शटर बंद करून गुपचूप आपलाही व्यवसाय करायचा नि सामोरच्यांची गरज भागवायची.
वास्तवात तसे करणे गुन्हा असेल, तो व्यवसायिक नियमभंग करीत असेल , मात्र वर-वधु पित्यांच्या विनंती खातर तो तसे करीत असेल, तर त्यास थोडी सूट देणे अपरिहार्य म्हटले पाहिजे .परंतु अशी कोणती दुकाने उघडली, ग्राहक दुकानात गेले व शटर बंद झाले तर तशा दुकानांची खबर महापालिका अतिक्रमण विभागास देणारी मंडळी सक्रिय आहेत.
मंगळवारी शहराच्या बळीराम पेठेतील साई प्लाझा या संकुलात अतिक्रमण पथकाने अशीच कारवाई करीत तब्बल ७ दुकाने सील केली .ते दुकानदार चोरी करीत नव्हते , नियमभंग हा की ते गरजवंत लोकांना मदतच करीत होते .बंद च्या काळात तशा लोकांना कोणतीच गर्दी न करता, दुकान आतून बंद करून घेत ते व्यवसाय करीत होते. त्यामुळे बाहेर गाजावाजा नव्हता. पण टीप दिली गेल्याने ती दुकाने सील करण्यात आली. विशेष म्हणजे साई प्लाझा तील दुकानांवर कारवाई होणार हे आधीपासून चर्चेत होते.
सध्या रमजानचे उपवास सुरू आहेत.त्यामुळे मुस्लिम बांधव संध्याकाळी फळे खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात.त्यासाठी आधीच जिल्हाधिकार्‍यांनी तात्पुरती अनुमती दिली असल्याचे सांगण्यात येते . तरीसुद्धा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी बळीराम पेठ साने गुरुजी चौकातील फळ विक्रेत्यांना पिटाळतात. त्यांचा माल जप्त करीत आहेत. विशेष उल्लेखनीय की, साने गुरुजी चौकात फ्रुट कॉर्नर नावाचे दुकान असून त्या दुकानाचा भलामोठा पसारा बाहेर असतो . तो मात्र कारवाई पासून सुटतो ते कसे ? असा प्रश्न अन्य विक्रेत्याचा आहे. त्यामुळे अतीक्रमाण विभाग तोंड पाहून कारवाई करतो अशी नागरीकांची ओरळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here