जळगाव : प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना अत्यावश्यक कामासाठी पीपीई किट घालून प्रवेश दिला जात आहे. ज्या नातेवाइकांची हलाखीची परिस्थिती आहे अशांना ६० जणांना भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइक महिला व पुरुषांची राहण्याची व्यवस्था पद्मावती मंगल कार्यालयात करण्यात आली आहे.
त्या ठिकाणी मुक्कामी असलेल्या रुग्णांच्या ६० नातेवाइकांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, उद्योजक रजनीकांत कोठारी,
उद्योजक अमित भाटिया
यांच्या हस्ते पीपीई किट देण्यात आले. याप्रसंगी भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी, रितेश लिमडा, दीपक विधाते, सचिन महाजन उपस्थित होते.