सोयगाव प्रतिनिधी
कवली ता सोयगाव शेती शिवारात अचानक भर दुपारी बिबटया प्रगटल्याने शेतात दावणीला बांधलेल्या तीन शेळ्यांवर हल्ला चढवून ठार केल्याची खळबळ जनक घटना शुक्रवारी दुपारी गट क्र.१८ मध्ये घडली याप्रकरणी वनविभागाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला असून मृत शेळ्यांवर पशुसंवर्धन विभागाने सायंकाळी उशिरा शवविच्छेदन केले.
कवली ता सोयगाव शिवारात गट क्र.१८ मध्ये शेतकरी दगडू भिकन सय्यद यांच्या शेतात दावणीला तीन शेळ्या बांधल्या होत्या शेतात दिवसभर कपाशी लागवडीचे काम झाल्यावर शेतकरी दगडू भिकन सय्यद मजुरांसह घरी गेला परंतु शेतात शेळ्या बांधून ठेवण्यात आलेल्या असतांना दबा धरून बसलेल्या बिबटयाने या तिन्ही शेळ्यांवर हल्ला चढवून त्यांना फस्त केले तर एकीच्या नरडीचा घोट घेतला आहे बिबटया दुपारपासून दबा धरून बसला असल्याचे मजुरांनी सांगितले वन विभागाचे पथकाने घटनेचा पंचनामा केला आहे.
बिबट्याच्या दहशतीचे कवलीत धास्ती
गावलगत असलेल्या शिवारात अचानक बिबटया प्रगटल्याने कवली गावात दहशत पसरली होती ऐन खरिपाच्या हंगामात बिबट्या ने डोकेवर काढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्या मोकाट बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.