भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कजगाव सह परिसरात अवैध धंदे सोप्या व खुलेआम पद्धतीने जोमात सुरू आहे स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयिस्करपणे कानाडोळा करीत आहे पोलीस प्रशासन कारवाई केली मात्र नावाने , नागरिकांना कठोर कारवाईची अपेक्षा होती तरी प्रशासन या यावर कठोर पाऊल उचलावे अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून होत आहे,
हे धंदे सोप्या पद्धतीने खुलेआम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? या सुरू असलेल्या अवैध धंद्याची सर्वसाधारण ग्रामस्थांना माहिती आहे, पण स्थानिक पोलिस प्रशासनाला याची माहिती नाही का असे सर्वसाधारण प्रश्न उपस्थित होत आहे. या अवैध धंद्यात मुळे लोकांची लुबाडणूक होत आहे अनेक घरात कलह वाढले आहे घरातील व्यसनाधीन व्यक्तीमुळे विशेषता कष्टकरी महिलांचे मोठे नुकसान होत आहे अल्पवयीन मुलेही जुगाराच्या अहारी जाण्याची शक्यता आहे तसेच सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोना काळामध्ये अवैध धंद्यामुळे कोरोना चा फैलाव अधिक होऊ शकतो करिता सट्टा जुगार धंदे बंद करणे अतिशय गरजेचे आहे मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे कजगाव परिसरात जुगार मटका गुटखा यासह अन्य अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरु आहे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तरुण व्यसनाधीन होत आहे अनेक महिलांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे अवैध धंद्यामुळे उभा राहणारा पैशातून गैरकृत्य केल्या जाण्याची शक्यता असते ते सामाजिक तत्त्वाला घातक ठरणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी जोर धरत आहे.