ब्रेकिंग : नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसला मोठी आग

0
31

नंदुरबार, प्रतिनिधी । नंदुरबार गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये मोठी आग लागली आहे. आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नंदुरबार स्थानकाच्या जवळ ही आग लागल्याची माहिती मिळत आहे..

गांधीनगरवरून पूरीकडे जाणाऱ्या गांधीधाम एक्स्प्रेसला नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ मोठी आग लागली आहे. पॅन्ट्री कार आणि एका एसी बोगीला ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नंदुरबार स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज नसल्याने, आगीने रौद्र रुप धारण केले. सध्या नंदुरबार स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आग लागलेल्या डब्यातील प्रवाशी वेळीच बाहेर पडले होते. परंतू त्यांच्या सामानाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पॅन्ट्री कारमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास, ही आग आणखी भडका घेऊ शकते अशी शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रेनमधील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here