बोधगया महाविहार मुक्तीसाठी धरणे

0
4

 

बोधगया महाविहार मुक्तीसाठी धरणे

जळगाव (प्रतिनिधी) –

बोधगया हे जगातील सर्व बौध्दांचे पवित्र स्थान आहे. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. या महाविहारावर ब्राह्मणांनी अनधिकृत कब्जा केला आहे. ते बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाचपैकी दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले.

महाबोधी टेम्पल ॲक्ट १९४९ बनविण्यात आला. यामुळे या महाविहारावर ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा आहे. या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय विरासत कायद्याचेही उल्लंघन होत आहे. हा कायदा रद्द करावा व हे महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे.

१८९५ वर्षी अनागरिक धर्मपाल विरुध्द महंत या वादाचा निकाल न्यायालयाने बौध्दांच्या बाजुने दिलेला असतानाही या महविहारावर ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा आहे. बौध्दविद्वान फाह्यान व युएनस्वांग यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनात व उत्खनन अहवालानुसार हे पवित्र स्थान बौध्दांचे असल्याचा उल्लेख आहे.या महाविहाराच्या जागेवर कब्जा केलेल्या महंताच्या खोलीत अद्यापही बुध्दप्रतिमा, शीलालेख, अभिलेखे आहेत. या ऐतिहासिक वास्तु पुरातत्व विभाग, बोधगया संग्रहालयात जमा करण्यात याव्या. या महाविहाराजवळ सम्राट अशोकाचा राजवाडा होता. तो शोधण्यात यावा. ईव्हीएममुळे बौद्धांच्याच नव्हे तर भारतीयांचा मताचा अधिकार प्रभावशुन्य झाला आहे. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मुद्य्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भदंत संघरत्न थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनाचे नेतृत्व मुकेश नेतकर यांनी केले.

या आंदोलनात एॅड. राजेश झाल्टे, जयसिंग वाघ, बाबुराव वाघ, राजु मोरे, प्रा. यशवंतराव मोरे, युवराज बनसोडे, सुमित्र अहिरे, देवानंद निकम, सुनिल देहडे, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, सुकलाल पेंढारकर , रविंद्र बाविस्कर, नितीन गाढे, प्रमोद सौंदळे, विनोद अडकमोल, नंदलाल आगारे, खुमानसिंह बारेला, भरत कोळी, भगवान इंगळे, रघुनाथ घोडेस्वार, आर. बी. परदेशी, अरुण जाधव, रविंद्र गायकवाड, कुंदन तायडे, योगेश सोनवणे, दिलीप तासखेडकर, विकास साबळे, एॅड. आनंद कोचुरे, अशोक सैंदाणे, चंद्रशेखर अहिरराव, दत्तु सोनवणे, सोनवणे, निलु इंगळे, इंदुबाई मोरे, उज्जवला इंगळे, अनिता पेंढारकर, सुनिता देहडे, शितल सोनवणे, दिपाली सोनवणे आदी बहुजनांनी सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here