बोदवड शहरातील पाझर तलाव प्रदुषण मुक्त करा

0
36

बोदवड ः प्रतिनिधी
जामठी रोड लगत पाझर तलावाच्या परिसरातील सर्व घातक कचरा जमा करून त्याचे योग्य विल्हेवाट लावून पाझर तलाव प्रदुषण मुक्त करावा अशी मागणी तालुका शिवसेने तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास मोठया प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हट्ले आहे की, गेल्या तीन वर्षापासुन बोदवड शहरातील केरकचरा, घाण तसेच घातक केमीकलयुक्त कचरा हा जामठी रोड लगत पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात घनकचरा चे ठेकेदार यांचे कडून संकलीत करण्यात येत आहे, गेल्या दोन वर्षापासुन तलावात टाकला जाणारा घातक केरकचरा प्लॉस्टीक व इतर विघातक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासनाकडे वेळोवळी लेखी व तोंडी स्वरुपात निर्दषणास आणले असता आपल्या स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पुढील महीन्यापासुन पावसाळा सुरु होणार असुन तलावात ( जामठी रोडवर ) जे जमा होईल ते घातक केमीकल युक्त कचरा तसेच प्लॉल्टीक कॅरीबॅग इतर घाण सोबत जमा होईल त्यामुळे शहरातील पशु यांच्या आरोग्यस आयकारक घटना घडतील याची नोंद घ्यावी तसेच बोदवड नगरपंचायतीला पाणी पुरवठा करणार्‍या विहीरी सदरच्या पाझर तलावा पासुन जाणार्‍या नाल्यालगत असल्याने बोदवड शहरातील नागरीकाच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होईल .
या सर्व बाबीचा योग्य विचार करून कार्यवाही करावी अन्यथा सदर प्रदुषणामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्यास आपल्या नगरपंचायत व घनकचर्‍याचे ठेकेदार यांचे विरोधात सदोष मनुष्यवधाचा व प्राणी वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल यास सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार असेल. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील जलप्रदुषण व वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे आपले प्रशासन शहारातील रहीवाशी यांचे कडुन घनकचरा व्यवस्थापण कर वसुल करीत आहे. शहरातील कचरा नागरीकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे.
निवेदन दिते वेळी शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, कैलास सुर्यवंशी, अल्प.तालुका प्रमुख आयुब कुरेशी, विभागप्रमुख गोपाळ पाटील, नईमखान बागवान, पंकज वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here