बोदवड नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर

0
17

बोदवड, प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी २७जानेवारी रोजी नाशिक आयुक्त कार्यालयात आरक्षण सोडत होती यामध्ये बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण निघाले आहे. शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवून बहुमताचा आकडा गाठला असुन सेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते याची तालुक्यात उत्सुकता आहे.

या पदासाठी चार उमेदवारांचे नावाची चर्चा आहे . यामध्ये शिवसेनेचे गटनेते आनंदा पाटील याना मानले जाते पाटील आमदार चंद्रकांत पाटील याचे विश्वासू असुन शिवसेने मध्ये दहा नगरसेवकाच्या प्रवेश मागील काळात झाला त्यामध्ये त्याचे योगदान मोठे मानले जाते तसेच विद्यमान नगराध्यक्ष मुमताज बी बागवान याचे पती हाजी सईद बागवान हेही दावेदार मानले जात असुन मागील अनुभव तसेच निवडणुकीची सर्व जबाबदारी आपल्या खाद्यावर घेत पक्षाला बहुमताने पर्यंत नेणे ही त्यांच्या साठी जमेची बाजू राहील तसेच याच प्रमाणे मावळत्या नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष दिनेश माळी यांनी निवडणूक तोंडावर शिवसेनेत प्रवेश करत शहरात सर्वात जास्त मताधिक्याने आपल्या पत्नी मीराबाई माळी यांना निवडून आणले व प्रभागात एकतर्फी विजय मिळवला आहे .तसेच माजी नगरसेवक सुनील बोरसे या च्या पत्नी शारदा बोरसे यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे. या बाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता गट नेते आनंदा पाटील यांनी सांगितले जर शिवसैनिकांचा आग्रह असला आणि वरिष्ठांनी संधी दिली तर आदेशाचे पालन करत पदास न्याय देऊ. सईद बागवान, व मीराबाई माळी आणि शारदा बोरसे यांनी वरिष्ठांच्या निर्णयानुसार सुचनेचे पालन करू असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here