Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»बोदवड»बोदवड नगरपंचायत च्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदी आनंदा पाटील तर उपनगराध्य पदी रेखा गायकवाड
    बोदवड

    बोदवड नगरपंचायत च्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदी आनंदा पाटील तर उपनगराध्य पदी रेखा गायकवाड

    saimat teamBy saimat teamFebruary 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    बोदवड प्रतिनिधी :- नगरपंचायत नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे आनंदा पाटील तर उपनगराध्यक्ष पदी रेखा गायकवाड यांची निवड झाली
             आज दिनांक 18 रोजी बोदवड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक पार पडली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील व राष्ट्रवादी कडून योगिता खेवलकर हे निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते व उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कडून रेखा गायकवाड आणि राष्ट्रवादीकडून मुजमिल शाह यांचे उमेदवारी अर्ज आलेले होते सभेमध्ये निवडी साठी हात उंच करून मतदान घेण्यात आले त्यात शिवसेनेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना शिवसेनेचे नऊ नगरसेवक आणि भाजप च्या एकमेव उमेदवाराने मतदान केले त्यानुसार दहा विरुद्ध सात शिवसेनेने नगरपंचायत वर आपली सत्ता प्रस्थापित केली
    बोदवड नगरपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी भाग भुसावळ तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी कामकाज पाहिले तर सहाय्यक म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे हे होते निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून फुलांच्या पाकळ्या,गुलाल यांची उधळण करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या सह सेनेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची मिरवणूक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत मिरवणूक काढली व मिरवणुकी दरम्यान बोदवड ची ग्रामदेवता रेणुका देवी मंदिरात दर्शन घेऊन शिवद्वार वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले त्यानंतर गांधी चौक जवळील बोदवड शाहवली बाबा यांच्या मजार वर चादर चढवली तेथून  आमदारासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले आणि भिल वाडी जवळ एकलव्य तसेच भुसावळ चौफुली वर महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई,  तुषार बोरसे,सुनिल पाटील, जीवन जाट,शांताराम कोळी, गणेश टोगे,दिपक माळी ,मनोज राजपुत,देवेश सोनार,अजय पाटील,मनोज पाटील,गोपाल पाटील, यांच्या सह अनेक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bodwad : बोदवड न्यायालयात घुमला गाडगे बाबांच्या विचारांचा गजर

    December 23, 2025

    Bodwad : बोदवडमध्ये राष्ट्रीय लोक अदालत ठरली ‘जन अदालत’

    December 13, 2025

    Cruiser Accident : क्रुझरचा अपघात : बोदवडच्या १३ पैकी दोन खेळाडूंवर काळाचा घाला

    June 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.