बोदवड नगरपंचायत : खडसेंची आघाडी, राष्ट्रवादी दोन, तर शिवसेना एका जागेवर विजयी

0
29

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे.

बोदवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रथमच या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणूकीत सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत.

खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. एकनाथ खडसे यांनीही या निवडणूकीसाठी स्वत: मैदानात उतरूण प्रचार केला आहे, तर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनीही यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे.
Bodwad Nagar Panchayat election
एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावर आज येणार जनतेचा कौल!

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याही नेतृत्वाची ही कसोटी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर शिवसेनेने निवडणूकीत संपूर्ण १७ जागा लढविल्या आहेत. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केले आहेत, तर शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाचीही कसोटी आहे. तर भाजप नेते गिरीश महाजन यांच्याही नेतृत्वाची कसोटी आहे,

सध्याची परिस्थिती

प्रभाग क्रमांक 1

1भाजपा वैशाली कुलकर्णी 73

2सेना रेखा गायकवाड 466 विजय

3काँग्रेस कुसुम तायडे 14

4राष्ट्रवादी प्रमिला वराडे 279

5 नोटा

प्रभाग क्रमांक 2

1काँग्रेस अंकुश अग्रवाल 11

2 संभाजी ब्रिगेड रेखा ढोले 11

3 शिवसेना सचीन देवकर 243

4 राष्ट्रवादी भरत आप्पा पाटील 338 विजय

5भाजपा महेंद्र पाटील 75

6 नोटा 2

प्रभाग क्रमांक 3

1राष्ट्रवादी योगिता खेवलकर 405विजय

2 सेना सुजाता खेवलकर383

3 भाजपा कविता जैन 164

4 वचीत शुभांगी मोरे 5

5 नोनोटा7

नगरपंचायतीचे नाव-कुडाळ

एकुण जागा-17

भाजप-4

शिवसेना-2

काँग्रेस-

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)-

नगरपंचायतीचे नाव-वैभववाडी

एकुण जागा-17

भाजप-2

शिवसेना-1

काँग्रेस-

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)-1

नगरपंचायतीचे नाव – शहापुर

एकुण जागा- 17 जागेसाठी

भाजप- 2

शिवसेना- 4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here