यावल प्रतिनिधी
विनापरवानगी बोगस शिक्षक भरती संदर्भात जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये शिक्षण विभागातील रागिनी चव्हाण, श्रीमती दिपाली पाटील यांनी यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची चौकशी केली.
दि.14 जून2022रोजी जिल्हा परिषद जळगाव शिक्षण विभागातील अधिकाऱ्या मार्फत चौकशी करण्यात आली.
नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण संस्थेत विना परवानगी बोगस शिक्षक भरती करण्यात आली तसेच संस्था घटना मुद्दा क्र.25अन्वये संस्थेच्या कार्यरत मंडळाचे डिसेंबर2018 मध्ये कार्यकाळ संपला आहे.असे असताना संस्थेचे अध्यक्ष व संस्था चालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व धर्मादाय सहआयुक्त यांची परवानगी न घेता बिना परवानगीने अनधिकृत पणे बोगस शिक्षक भरती केली असल्याचे आढळून आले आहे. चौकशी वेळी संस्था अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे जाब जबाब घेण्यात आले. तक्रारदार आबीद खान,गुलाम मुस्तफा हाजी, आसीफ खान हजर होते. पुढील कार्यवाहीसाठी जि.प.जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी व धर्मादाय सह उपायुक्त जळगांव यांच्याकडे चौकशी अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती गुलाम मुस्तफा,गुलाम मुस्तुफा हाजी,आबीद खान आसीफ खान यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांनी बेकायदा बोगस शिक्षक भरती केली आहे किंवा नाही याबाबत संबंधित काय कारवाई करतील? याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष वेधून आहे.