बॉक्सींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सन्मान

0
21

भुसावळ, प्रतिनिधी । राज्यस्तरीय बॉक्सींग चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच बुलढाणा येथे झाली. या स्पर्धेत भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने या खेळाडूंचा भुसावळात सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनमार्फत 12 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. नागेश अर्जुन खरारे या स्पर्धकाने क्रीडा प्रबोधिनी, अकोला येथील बॉक्सरला नमवत सुवर्ण पदक पटकावल्याने त्याची कर्नाटक येथे होणार्‍या राष्ट्रीय एलिट मेन बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाल्याने खरारे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात मो.साजीद, साकेत तायडे, शुभम निकम, मंगेश सावत, सिद्धार्थ सपकाळे, महेश खरात, चेतन आव्हाड, नागेश खरारे, अजय सपकाळे, शेख मोहम्मद जैद, अक्षय मोरे तसेच कोच अनिल सपकाळे, रोहित जंजाळे आदींचा गौरव करण्यात आला.

यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा गौरव
भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनचे अध्यक्ष व केशिअस स्पोटर्स अ‍ॅकेडमीचे फाऊंडर राहुल घोडेस्वार, सचिव सी.आर.गुप्ता, कोषाध्यक्ष राष्ट्रीय पदक विजेते सुनील नवगीरे, उपाध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू मनोज सूर्यवंशी, सदस्य सुंदर मांगीलाल बारसे, जितू संगेले, दीपक शंकुपाई, एमबीचे पंच पवन शिरसाट, समितीचे उपसचिव मुस्तफा घड्याली, कायदेशीर सल्लागार शे.ईस्माईल, मेघराज तल्लारे, सुबोध गवळी, पीटर एवेन्स, प्रवीण मोरे, निशांत तायडे, सचिव सुनील निकम, प्रकाश जाधव, विजय सोनवणे आदींनी उपस्थित खेळाडूंचा गौरव केला. दरम्यान, भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनने सर्व बॉक्सींग असोसिएशनला तत्काळ बॉक्सींग क्लबचे पंजीकरण करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here