जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बेळी गावात एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वृत्त असे की, तालुक्यातील नशिराबाद येथून जवळ असलेल्या बेळी येथील विद्या निवृत्ती नारखेडे (वय ३६) आणि गावातीलच रविंद्र चुडामण खाचणे (वय ४७) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने ९ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागीने आणि रोकडलांबविल्याची घटना उघडकीला आली आहे.
त्यात विद्या नारखेडे यांचा २५ हजार ५०० रुपयांचा तर रविंद्र खाचणे यांचा २ लाख २२ हजार रूपयांची रोकड असा एकूण २ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र साळुंखे करीत आहेत.