बिबट्याने पडला 2 वासरांचा फडशा,जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील घटनास्थळी भेट

0
76
धरणगाव प्रतिनिधी 
आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास चोरगाव येथे सुपडू अर्जुन सपकाळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या 2 वासरांचा फडशा बिबट्याने पडला. सदर घटना माहिती पडताच 7 वाजता जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील व माजी सभापती सचिन पवार त्वरित चोरगाव पोहोचले. त्यांनी तहसीलदार, वनअधिकारी यांना पाचारण केले.
गावाच्या बाहेर शेतकरी सुपडू अर्जुन सपकाळे यांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता म्हशीचे दूध काढून ते घरी गेले. लगेच बिबट्याने या गोठ्यावर हल्ला करीत गोठ्यातील वासराचा फडशा पाडला. बिबट्याने हल्ला केल्याने सपकाळे यांचे किमान पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे. वननिभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर येथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत.  वनक्षेत्रपाल दत्ता लोंढे साहेब, वनपाल राजकुमार ठाकरे, वनसंरक्षक शिवाजी माळी, वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी पंचनामा केला. त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी आणि शिवारात कॅमेरे लावून सापळा लावण्याच्या सूचना जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केल्या. याप्रसंगी माजी सभापती सचिन पवार, सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, उपसरपंच प्रवीण रमेश सोनवणे, अनिल पवार, संतोष अभिमन सोनवने, मस्तानशाह फकीर, जंगू बापू सोनवणे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
*शेतकरी धास्तावले*
चोरगाव शिवाराच्या रानावनात गुरे, शेळ्या, मेंढपाळ व पशुपालक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर धास्तावलेले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्याकडे करण्यात आली.
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here