नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र काही पक्षाने जाहीर केल्या नाहीत. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली.
गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नीसह लष्करातील ११ अधिकऱ्यांचे निधन झाले. आता रावत यांच्या एका कन्येला भाजप उत्तराखंडच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव भाजपने त्यांना पाठविला.
बिपीन रावत यांची सेवानिवृत्तीनंतर उत्तराखंड येथे राहण्याची इच्छा नव्हती. त्यांनी डेहरादून येथे घरही घेतली होते.पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. यापार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या मुलीला तिकीटची ऑफर दिली आहे. रावत यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एकीला भाजप तिकीट देणार आहे. मात्र अद्याप निवडणूक लढण्याबाबत त्यांच्या मुलींकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान काही दिवसापूर्वी स्वर्गिय बिपीन रावत यांचे बंधू कर्नल विजय रावत यांनी देहरादून येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र ते निडणूक लढणार नाही असे त्यांनी अगोदरच जाहीर केले आहे. बिपीन रावत यांची मोठी कन्या कृतिका या मुंबईत राहतात. त्या विवाहित आहेत. तर लहान कन्या तारिणी या दिल्ली उच्च न्यायालयात वकील आहेत. दोघींपैकी एका कन्येला भाजप देहरादून येथील डोईवाला किंवा कोटद्वार विधानसभेचे तिकीट देण्याच्या विचारात आहे.
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. येथील ८१ लाख ४३ हजार ९२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.