जळगाव ः प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वराज्य पॅनलचे प्रमुख भिकन नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल निवडून आले आहे. त्यात सचिन बिर्हाडे हे सरपंचपदी तर उपसरपंचपदी सौ. तुळसाबाई भिकन नन्नवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी कामकाज पाहिले.नवनिर्वाचित सरपंच सचिन बिर्हाडे व उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.