बांधकाम व्यवसायिक प्रभाकर खर्चे यांना मारहाण करणाऱ्या नगर भूमापन कार्यालयातील शिपायावर कारवाई करा

0
22
जळगाव : प्रतिनिधी   नगर भूमापन कार्यालयात उतारा काढण्यासाठी आलेले परीट समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा बांधकाम व्यवसायिक प्रभाकर खर्चे यांना कार्यालय आवारात जबर मारहाण करणाऱ्या नगर भूमापन कार्यलयाचे शिपाई सचिन लक्ष्मण महाले यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ (सर्व भाषिक) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
       दोन दिवसांपूर्वी नगर भूमापन कार्यालयात उतारा काढण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिक प्रभाकर खर्चे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने कार्यालयातील शिपाई श्री सचिन लक्ष्मण माळी यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करून दोषी असलेले गर भूमापन कार्यालयातील शिपाई श्री सचिन लक्ष्‍मण माळी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ( सर्वभाषिक) च्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरुण राऊत प्रदेश युवक कार्याध्यक्ष दीपक बाविस्कर प्रदेश सचिव शंकरराव निंबाळकर प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे प्रदेश सचिव अमर परदेशी पिंटू बेडिस्कर जयंत सोनवणे तिवणे अमोल रोकडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here