Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»बांधकाम विभागातील अभियंता शेख सईद शेख अहमद निलंबित नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी काढले आदेश
    यावल

    बांधकाम विभागातील अभियंता शेख सईद शेख अहमद निलंबित नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी काढले आदेश

    saimat teamBy saimat teamMay 5, 2021No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : तालुका प्रतिनिधी

    यावल नगरपरिषदेत काम करण्यासाठी नेमणूक असताना कामाकडे दुर्लक्ष केले, नगरपालिकेतील ठरावानुसार कामे न केल्याने, संबंधित कामांची काही कागदपत्र नगरपरिषद कार्यालयात आढळून येत नसल्याने, कामकाजात हलगर्जीपणा करून कर्तव्य पालनात कसूर केले आहे म्हणून, कनिष्ठ अभियंता  शेख सईद शेख अहमद यांना जबाबदार धरून नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ मधील तरतुदीनुसार निलंबित करण्यात येत आहे असा आदेश यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिला आहे. यामुळे संपूर्ण भुसावळ विभागात नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

    बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांसंबंधीचे जे देयके ठेकेदारांना प्रदान करण्यात आलेली आहे. त्या संबंधित जे लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले त्याबाबत आक्षेपाची पूर्तता न केल्याने आणि खुलासा केलेला नसल्याने, मूळ नस्ती मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून न दिल्याने, अर्जदार सुरेश जगन्नाथ पाटील, पंकज श्रावण सोनार यांच्या तक्रार अर्जानुसार फैजपूर रोडवरील कॉलेज जवळील कानतोडीच्या नाल्यात अनधिकृत संरक्षण भिंतीकडे बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने आणि इतर तक्रारी प्राप्त झाल्याचे निलंबन आदेशात नमूद केले आहे.

    निलंबन आदेशात म्हटले आहे की, यावल नगरपरिषद कनिष्ठ अभियंता शेख सईद शेख अहमद यांना दि.२६ एप्रिल२०२१रोजी दिलेल्या निलंबन आदेशात मुख्याधिकारी बबन तडवी यांनी नमूद केले आहे की,महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान‘‘ राबविणे बाबत विविध मुदतीत शासनाने सदर योजना दिनांक २/१०/२०२० ते २१/ ३/२०२१या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्राधान्याने राबविणेबाबत निर्णय झालेला होता त्यानुसार सदर काम करण्यासाठी आपली नेमणूक करण्यात आलेली होती सदरचे कामे जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे रेन वॉटर व पर्कॉलेशन हाती घेण्यात आलेली रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे पूर्ण करणे व विविध उपाययोजना करणे व वृक्षारोपण करणेकामी आपण वरील सर्व कामांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ठेकेदाराने वृक्षरोपण नदी प्रवाहामध्ये व मोठ्या वृक्षांच्या छायेमध्ये रस्त्यामध्ये वृक्षारोपण केले तसेच निकृष्ट वृक्षाची लागवड केली व याबाबत काही नागरिकांच्या तक्रारी प्राप्त आहेत सदर तक्रारीकडे आपण दुर्लक्ष केले.

    सर्वसाधारण सभा दि.२२/२/२०१७रोजी ठराव क्र.२४ विषय क्र.२२ अन्वये पाणीपुरवठा विभागातील साठवण तलावावरील बॅलेंसिंग ट्रॅक मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने गळती थांबविण्यासाठी अत्यावश्यक उपाय योजना करणे व नवीन अतिरिक्त पाणी साठवणूक तलाव बांधणे बाबत ठराव पारित करून सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करणे या कामासाठी तांत्रिक सल्लागार यांची नेमणूक करणे जागेची उपलब्धता पाहणे या संदर्भातील सर्व अधिकार सदर ठरावान्वये कनिष्ठ अभियंता म्हणून आपणास सर्वानुमते प्रदान करण्यात आले होते.

    सदर ठरावानुसार आपण कोणतीही कामे केलेली दिसून येत नाही किंवा त्या संदर्भातील कोणतेही कागदपत्र नगरपरिषद कार्यालयात आढळून येत नाही आपण सदर तलावासाठी आवश्यक लागणार्‍या जागेबाबत भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी देखील करुन घेतली नाही त्यामुळे सद्यस्थितीत सदर जागेमध्ये नवीन तलाव बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे यामध्ये आपण हलगर्जीपणा करून कर्तव्य पालनात कसूर केले आहे तसेच जुन्या तलावाचे कागदपत्रेही आढळून येत नाही याबाबतही आपण लेखी खुलासा केलेला नाही यास देखील आपणास जबाबदार धरण्यात येत आहे.

    बांधकाम विभागाच्या विविध विकास कामासंबंधीचे जे देयके आपल्या कार्यकाळामध्ये ठेकेदारांना प्रदान करण्यात आलेली आहे व त्या संबंधित जे लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत त्याबाबतचे आक्षेपांची पुर्तता आपण केलेली नाही व ते नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर देखील सादर केलेले नाही.

    आपल्या कार्यकाळात नगरपरिषदेच्या मालकीचे अग्नीशमन इमारतीचे बांधकाम केलेले आहे सदर कामाचे अंदाजपत्रकानुसार शौचालयाचे सेप्टिक टॅकचे बांधकाम न करता आपण देयके अदा केल्याचे दिसून येते व ती मूळ नसती आपण मुख्याधिकारी यावल यांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही.

    कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल जवळील कानतोडीच्या नाल्यातील केलेल्या अतिक्रमण संदर्भात अर्जदार सुरेश जगन्नाथ पाटील व पंकज श्रावण सोनार यांच्या दि.९/३/२०२१रोजी च्या तक्रार अर्जामध्ये नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये बेकायदेशीरपणे संरक्षण भिंत बांधली याबाबत तत्कालीन अभियंता म्हणून आपण अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केलेले असून त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत व त्यास आपण जबाबदार आहात याबाबत आपण अद्याप काही खुलासा केलेला नाही.

    अशाप्रकारे आपण कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात नियमितता दडवून आणून आपण कर्तव्यात कसूर केला आहे यास आपणास जबाबदार धरण्यात येत आहे.आपण कर्तव्यात कसूर केला म्हणून आपणास महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम१९६५चे कलम७९व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम१९७९मधील तरतुदीनुसार आपणास या आदेशान्वये निलंबित करण्यात येत आहे.

    तसेच दोषारोप स्वतंत्र बजाविण्यात येतील व चौकशीअंती जे नव्याने दोषारोप समोर येतील ते देखील नव्याने बजवण्यात येतील याची नोंद घ्यावी आपणास निलंबन कालावधीतील निर्वाहभत्ता नियमानुसार अदा केला जाईल. माहितीस्तव आदेशाच्या प्रती यावल नगरपरिषद बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता शेख सईद शेख अहमद, यावल नगरपालिका अध्यक्षा,यावल नगरपरिषद प्रशासन अधिकारी अस्थापना प्रमुख,यावल नगर परिषद लेखापाल यांच्याकडे निर्वाहभत्ता चे देयक प्रदान करण्यासाठी अग्रेसीत प्रति देण्यात आल्या आहेत.

    यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कनिष्ठ अभियंता शेख सईद शेख अहमद यांना निलंबित करण्याचा आदेश काढल्याने यावल नगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक अध्यक्षांसह नगरपालिका कर्मचारी वर्तुळात व यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yāvala : सांगवी बु. येथे जनजागृती शिबिर

    December 20, 2025

    Satpura : मनसेतर्फे सातपुडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना लेझीम संच वाटप

    December 8, 2025

    District Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यावल, रावेर नगरपरिषद निवडणूक विषयक कामाचा आढावा

    November 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.