जळगाव ः प्रतिनिधी
परिवर्तनची दहा वर्ष ही सांस्कृतिक स्थिंत्यतराची दशकपूर्ती असून जळगाव शहरातलं नाटक, संगीत, नृत्य , चित्र, साहित्य या सर्व कलांचा समुच्चय साधत उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती हेच परिवर्तनचे वैशिष्ट्य व उद्देश असल्याचे मत प्रास्ताविकात नारायण बाविस्कर यांनी परिवर्तन दशकपूर्ती उत्सवाच्या उपक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी राम पवार, संदीप पाटील, अपर्णा भट, विजय पाठक, चंदू नेवे आदी प्रमुख पाहुणे म्हणुनउपस्थित होते. दशकपूर्ती उत्सवाला अपर्णा भट यांच्या शिष्यांचा ’बहुरंगी यमन’ या कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाने झाली.प्रभाकर संगीत कला अकादमीच्या विद्यार्थींनी यमन रागातील गणेश वंदना, शिव वंदना, उई मा उई मा ये क्या हो गया, कभी आर कभी पार लागा तिर ए नजर, के सरा सरा सरा जो भी हो सो हो, तराना..राग यमन मध्ये नृत्य सादर केलीत. भाऊंच्या उद्यानातील अँफिथिएटर झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यात अपर्णा भट यांच्या मार्गदर्शनाखाली कोमल चव्हाण, मृणाल सोनवणे, ऋतूजा महाजन, हिमानी पिले, मृण्मयी कुलकर्णी, सानिका कानगो, आकांक्षा शिरसाळे, रिद्धी जैन, मधुरा इंगळे, वांङ्मयी देव यांनी कथ्थक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा भिडे, सोनाली पाटील, प्रतिक्षा कल्पराज, हर्षदा कोल्हटकर, निलिमा जैन, अनुषा महाजन, पालवी जैन, हर्षदा पाटील, यांनी परिश्रम घेतले.